इतिहास बदलणारी भारतीय युद्ध

इतिहास बदलणारी भारतीय युद्ध (Marathi)
passionforwriting
भारतावर आजपर्यंत अनेक वेळा परकीय आक्रमण झाले आहे. या युद्धांचा भारतीय इतिहासावर खूप खोलवर परिणाम झाला. इथे आम्ही माहिती देत आहोत त्या युद्धांच्या बाबतीत ज्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीय इतिहास परावर्तीत केला.Chapters
भूमिका
भूमिका
आजपासून १२५५ वर्षांपूर्वी पर्यंत अखंड भारताच्या सीमेत अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, तिबेट, भूतान, बांगलादेश, बर्मा, इंडोनेशिया, कंबोडिया, व्हिएत्नम, माल्षीय, जावा, सुमात्रा, मालदीव आणि इतर अनेक छोटी मोठी क्षेत्र होती. अर्थात सर्व क्षेत्रांचे राजा वेगवेगळ होते परंतु सर्व म्हणवले जात होते भारतीय जनपद. आज या संपूर्ण क्षेत्राला अखंड भारत म्हटले जाते. आज ज्याला आपण भारत म्हणतो, प्रत्यक्षात त्याचे नाव हिंदुस्तान आहे, जिथे इंडियन लोक राहतात. आधी हा फक्त भारत होता. जात, भाषा, प्रांत आणि धर्माच्या नावावर अखंड भारताचे तुकडे तुकडे करण्यात आले आहेत. इथे आपण पाहणार आहोत असे ११ मोठे संघर्ष ज्यांच्यामुळे अखंड भारत नष्ट झाला आहे.
असे मानले जाते की प्राचीन काळी देवता आणि असुर यांच्यात युद्ध होत असे. एकीकडे जिथे देवतांच्या राजधानीला इंद्रलोक म्हटले जात असे तिथे असुरांची राजधानी पाताळात होती. हिमालयाच्या एका क्षेत्रात इंद्रलोक होते. प्रत्येकाला इंद्राच्या पदाची अभिलाषा होती. संपूर्ण भारतवर्षात देव संस्कृतीचे शासन होते. देव आणि असुर यांच्ण्यात १२ वेळा संपूर्ण धरतीच्या राज्यासाठी युद्ध झाले ज्याला देवासुर संग्राम म्हटले जाते. इंद्र हे एक पद होते, कोणा देवाचे नाव नाही. द्वापार युगापर्यंत एवढे देव इंद्रपदावर बसले आहेत - यज्न, विपस्चित, शीबि, विधु, मनोजव, पुरंदर, बाली, अद्भुत, शांति, विश, रितुधाम, देवास्पति आणि सुचि. अर्थात देवतांच्या अधिपतीला पराभूत करणारे खूप होऊन गेले जसे मेघनाद, रावण इत्यादी. देवासुर संग्रामाचा परिणाम असा झाला की असुर आणि सूर यांनी धरतीवर भिन्न भिन्न संस्कृती आणि धर्म यांना जन्म दिला आणि धरतीला आपसात वाटून घेतले. या संघर्षांमध्ये देवता नेहमीच कमजोर सिद्ध झाले आणि असुर ताकदवान.
या दरम्यान हैहय आणि परशुराम यांच्यातील युद्धाची चर्चा मिळते. त्यानंतर राम - रावण युद्ध झाले. रामाच्या जन्माला ७,१२९ वर्ष झाली आहेत. रामाचा जन्म इ.स.पू. ५११४ मध्ये झाला होता. राम आणि रावणाचे युद्ध इ.स.पू. ५०७६ मध्ये झाले होते म्हणजे आजपासून ७०९० वर्षांपूर्वी. तेव्हा प्रभू श्रीराम ३८ वर्षांचे होते. हे युद्ध ७२ दिवस चालले होते. राम - रावण युद्धानंतर दहा राज्यांचे युद्ध झाले. ऋग्वेदात या युद्धाची चर्चा मिळते. ही रामायण काळातील गोष्ट आहे. दसराज्य युद्ध त्रेतायुगाच्या अखेरच्या काळात लढण्यात आले. असे मानले जाते की राम - रावण युद्धानंतर १५० वर्षांनी हे युद्ध झाले होते. ऋग्वेदाच्या ७ व्या मंडलात या युद्धाचे वर्णन मिळते.
दसराज्य युद्धानंतर सर्वांत मोठे युद्ध महाभारताचे झाले. कुरुक्षेत्रावर पांडव आणि कौरव यांच्यात आजपासून ५००० वर्षांपूर्वी महाभारताचे युद्ध झाले होते.१८ दिवस चाललेल्या या युद्धात भगवान कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. कृष्णाचा जन्म इ.स.पू. ३११२ मध्ये म्हणजे आजपासून ५१२१ वर्षांपूर्वी) झाला. महाभारताचे युद्ध इ.स.पू. २२ नोव्हेंबर ३०६७ ला झाले होते. त्या वेळी भगवान कृष्ण ५५ - ५६ वर्षांचे होते.
या युद्धाचे सर्वांत भयानक परिणाम झाले. धर्म आणि संस्कृतीचा नाश झाला. लाखो लोक मारले गेले आणि लाखो महिला विधवा झाल्या आणि तेवढीच मुलं अनाथ झाली. इथूनच भारताची दश आणि दिशा बदलत गेली. या युद्धानंतर अखंड भारत विखरू लागला.... नवीन धर्म आणि संस्कृती यांचा जन्म होऊ लागला अनु हळू हळू सर्व बदलून गेले. चला पाहूयात कोणती आहेत ती युद्ध ज्यांनी भारताचा नकाशा बदलण्यास सुरुवात केली. भारताचे भाग्य इथूनच बदलायला लागले.
चंद्रगुप्त-धनानंद युद्ध
सम्राट अशोक - कलिंग युद्ध (इ.स.पू.२६१)
चंद्रगुप्त मौर्यच्या काळात पुन्हा भारतवर्ष एका सूत्रात बांधले गेले आणि या कालावधीत भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली. सम्राट अशोक इ.स.पू.२६९ - २३२) प्राचीन भारताचे मौर्य सम्राट बिंदुसर यांचा पुत्र चंद्रगुप्त मौर्य याचा पुत्र होता ज्याचा जन्म साधारण इ.स.पू.३०४ मधील मानला जातो. भावांसोबत राजयुद्ध केल्यानंतरच अशोकला राजसिंहासन मिळाले.
ओडीसाची राजधानी भुवनेश्वर पासून ५ किमी सूर कलिंग युद्धात झालेला नरसंहार आणि विजित देशातील लीकांचे काष्ठ पाहून अशीकाच्या आंतरमनाला तीव्र धक्का पोचला. इ.स.पू. २६० मध्ये अशोकाने कलिंग वर आक्रमण केले आणि त्यांना पुर्नापडे चिरडून टाकले. युद्धातून झालेला विनाश पाहून सम्राट शोकाकुल झाला आणि प्रायश्चित्त घेण्यासाठी त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि एक भिक्षुक बनला. अशोक भिक्षुक बनल्यानंतर भारताच्या पतनाला सुरुवात झाली आणि भारत पुन्हा हळूहळू अनेक प्रांतांमध्ये विभागला गेला.
मौर्य वंशाच्या पतनानंतर बराच काळ भारतामध्ये राजनैतिक एकता प्रस्थापित होऊ शकली नाही. कुषाण आणि सातवाहन यांनी राजनैतिक एकता आणण्याचा प्रयत्न केला. मौर्योत्तर काळानंतर इ.स. तिसऱ्या शतकात तीन राजवंशांचा उदय झाला ज्यामध्ये मध्य भारतात नाग शक्ती, दक्षिणेत बाकाटक आणि पूर्वेला गुप्त वंश प्रमुख आहेत. या सर्वांत गुप्तकाळाला भारताचा सुवर्णकाळ मानले जाते. गुप्तांनी चांगल्या प्रकारे शासनकेले आणि भारताला बाह्य आक्रमणांपासून सुरक्षित ठेवले.
हर्षवर्धन इ.स. ६०६ ते इ.स. ६४७) : यानंतर अखेर एक महान राजा झाला - हर्षवर्धन ज्याने भारताच्या एका खूप मोठ्या भूभागावर राज्य केले. त्याच दरम्यान अरब मध्ये महम्मदने एका नव्या धर्माची स्थापना केली. हर्षवर्धनने भारताला विदेशी आक्रमणांपासून सुरक्षित ठेवले. त्याने जवळ जवळ ४१ वर्षे शासन केले.
फारसी आणि युनानींचे आक्रमण
.घुसखोरी : या सीमेवरील राज्यांमध्ये व्यापाराच्या माध्यमातून अनेक फारसी आणि युनानी लोकांनी आपले अड्डे बनवल होते, दुसरीकडे अरबी लोकांनी देखील समुद्र किनाऱ्यावरील क्षेत्रात आपली व्यापारी ठिकाणे बनवून आपल्या लोकांची तिथली संख्या वाढवली होती. अफगाणिस्तान मध्ये आधी आर्यांचे कबिले खूप होते आणि ते सर्व वैदिक धर्माचे पालन करत असत, पुढे बौद्ध धर्माच्या प्रचारानंतर हे स्थान बौद्धांचा गड बनला. बामियान ही बुद्धांची राजधानी होती.
सिकंदरचे आक्रमण
सिकंदर आणि पोरस युद्ध (326 ई.स.पू.)
७ व्या शतकानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान भारताच्या हातातून निसटत गेले. ७ व्या शतकाच्या अखेरच्या काळात मोहम्मद बिन कासिमचे सिंध वर आक्रमण आणि नंतरच्या मुस्लीम शासकांकडून भारतात इस्लामिक शासनाचा विस्तार झाला. साधारण ७१२ मध्ये इराकी शासक अल हज्जाज याचा पुतण्या आणि जावई मोहम्मद बिन कासिम याने वयाच्या १७ व्या वर्षी सिंध आणि बाळूच अभियानाचे सफल नेतृत्व केले.
इस्लामी खालीफांनी सिंध फत्ते करण्यासाठी अनेक अभियाने चालवली. १० हजार सैनिकांचे एक दल उंट आणि घोड्यांसकट सिंधवर आक्रमण करण्यासाठी पाठवण्यात आले. सिंध प्रांतावर इ.स. ६३८ ते ७११ पर्यंत ७४ वर्षांच्या कालावधीत खालीफांनी १५ वेळा आक्रमण केले. १५ व्या आक्रमणाचे नेतृत्व मोहम्मद बिन कासिम याने केले.
मोहम्मद बिन कासिम एक अत्यंत क्रूर योद्धा होता. सिंधचे दिवाण गुंदुमल यांच्या मुलीने शिरच्छेद मान्य केला, परंतु मीर कासीम ची पत्नी बनणे नाकारले. त्याच प्रकारे तिथला राजा दाहीर (इ.स. ६७९ मध्ये राजा बनला) आणि त्याच्या पत्नींनी देखील आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. सिंध देशाच्या सर्वच राजांच्या कहाण्या अत्यंत मार्मिक आणि दुःखदायी आहेत. आज हा सिंध देश पाकिस्तानातील एक प्रांत बनून राहिला आहे. राजा दाहीर एकट्यानेच अरब आणि इराण च्या नराधमांशी लढत राहिला. कोणीही त्याला साथ दिली नाही, काही लोकांनी तर त्याच्याशी गद्दारी केली.
महमूद गजनी (997-1030)
महमूद ने सोमनाथ मंदिरातील शिवलिंग तोडले. मंदिर उध्वस्त केले. असे म्हणतात की त्याने हजारो पुजाऱ्यांना ठार केले आणि तो मंदिराचे सोने आणि भारी खजिना लुटून घेऊन गेला. एकट्या सोमनाथ मंदिरातून त्याला आतापर्यंतची सर्वांत मोठी लूट मिळाली. त्याचे अंतिम आक्रमण इ.स. १०२७ मध्ये झाले. त्याने पंजाब आपल्या राज्यात सामील करून घेतले होते आणि लाहोरचे नाव बदलून महमूदपूर केले होते. महमूदच्या या आक्रमणांनी भारताचे राजवंश दुर्बल झाले आणि नंतरच्या वर्षांत विदेशी मुस्लीम आक्रमणांसाठी इथले द्वार उघडे झाले.
महम्मद घोरीचे आक्रमण
त्याने भारतावर पहिले आक्रमण इ.स. ११७५ मध्ये मुलतान वर केले, दुसरे आक्रमण इ.स. ११७८ मध्ये गुजरात वर केले. यानंतर इ.स. ११७९ - ८६ च्या दरम्यान त्याने पंजाब वर विजय मिळवला. त्यानंतर त्याने इ.स. ११७९ मध्ये पेशावर आणि ११८५ मध्ये सियालकोट आपल्या ताब्यात घेतले. इ.स. ११९१ मध्ये त्याचे युद्ध पृथ्वीराज चौहान याच्याशी झाले. या युद्धात घोरी फार वाईट प्रकारे पराभूत झाला. या युद्धात त्याला बंदी बनवण्यात आले परंतु क्षमायाचना केल्यावर आणि पुन्हा आक्रमण न करण्याचे वाचन दिल्यावर पृथ्वीराज चौहानाने त्याला सोडून दिले. असे अनेक वेळा झाले. या युद्धाला तराइनचे प्रथम युद्ध म्हटले जात असे.
यानंतर घोरीने अधिक ताकद एकवटून पृथ्वीराज चौहानावर आक्रमण केले. तराइनचे हे दुसरे युद्ध इ.स.११९२ मध्ये झाले होते. या युद्धात मात्र पृथ्वीराज चौहान पराभूत झाला आणि त्याला बंदी बनवण्यात आले. अये मानले जाते की पुढे त्याला गजनी इथे नेऊन मारण्यात आले. यानंतर घोरीने कन्नौज चा राजा जयचंद याला पराभूतकेले ज्याला चंदावरचे युद्ध म्हटले जाते. असे मानले जाते की तराइनच्या दुसऱ्या युद्धात कन्नौज राजा जयचंद याच्या मदतीनेच घोरीने पृथ्वीराजाला हरवल होते. मग त्याने जयचंदला पण धोका दिला. घोरी भारतात गुलाम वंशाचे शासन स्थापन करून पुन्हा आपल्या राज्यात परत गेला.
तैमूर लंगचे आक्रमण
जेव्हा तैमूर लंगने भारतावर आक्रमण केले, तेव्हा उत्तर भारतात तुघलक वंशाचे राज्य होते. इ.स. १३९९ मध्ये तैमूर लंगच्या दिल्ली वरील आक्रमणासोबतच तुघलक साम्राज्याचा अंत मानला गेला पाहिजे. तैमूर लंग मंगोल फौजा घेऊन आला तेव्हा त्याला कोणीही कडवा प्रतिकार केला नाही आणि तो कत्तल करत मजेत पुढे जात राहिला.
तैमूर लंगच्या आक्रमणाच्या वेळी हिंदू आणि मुसलमान दोघांनी मिळून जोहराचा राजपुती सोहळा केला होता म्हणजे युद्धात लढता लढता मृत्यू स्वीकारण्यासाठी बाहेर पडले होते. तो दिल्लीमध्ये १५ दिवस राहिला आणि त्याने या मोठ्या शहराचा कत्तलखान बनवून टाकला. पुढे काश्मीर लुटून तो समरकंदला निघून गेला. तैमूर लंग निघून गेल्यावर दिल्ली मुडद्यांचे शहर बनून राहिले होते.
बाबरचे आक्रमण
मोघल वंशाचा संस्थापक बाबर हा एक लुटारू होता.
त्याने चगताई तुर्की भाषेत आपले आत्मचरित्र 'तुजुक- ए-बाबरी' लिहिले. याला इतिहासात 'बाबरनामा' देखील म्हटले जाते. बाबरची टक्कर दिल्लीचा शासक इब्राहीम लोदी याच्याशी झाली होती. बाबरचा सर्वांत मोठा सामना मेवाड चा राणा सांगा सोबत होता. 'बाबरनामा' मध्ये याचे विस्तृत वर्णन आहे. संघर्षात इ.स.१९२७ च्या खन्वाहच्या युद्धात अखेर त्याला यश मिळाले.
बाबरने आपल्या विजात पत्रात स्वतःला मूर्तींच्या पायांचे खंडन करणारा म्हटले आहे. या भयंकर संघर्षात बाबरने गाझी ही उपाधी मिळवली. गाझी म्हणजे काफरांची कत्तल करणारा. त्याने क्रूरपणे हिंदूंची कत्तल केली एवढेच नव्हे तर अनेक हिंदू मंदिरे उध्वस्त केली. बाबरच्या आज्ञेवरूनच मीर बाकीने अयोध्येत राम जन्मभूमीवर असलेल प्रसिद्ध मंदिर नष्ट करून तिथे मशीद बांधली, याच प्रकारे ग्वाल्हेर जवळ उरवा मध्ये अनेक जैन मंदिरे नष्ट केली. २६ मे १७३९ ला दिल्लीचा बादशहा महम्मद शह अकबर याने इराणचा नादिर शाह याच्याशी हातमिळवणी केली आणि उपगणस्थान (अफगाणिस्तान) त्याच्या हवाली केले होते. १८७६ मध्ये अफगाणिस्तान एक मुस्लीम राष्ट्र बनले.
इंग्रजांचे आक्रमण
इंग्रजांनी व्यवस्थित रणनीती ठरवली आणि आधी ते व्यापार करण्याच्या निमित्ताने भारतात आले. १६१८ मध्ये जहांगीर याने इंग्रजांना भारतात व्यापार करण्याचा अधिकार दिला होता. त्यामागे जहांगिराची देखील रणनीती होती. जहांगीर आणि इंग्रजांनी मिळून १६१८ ते १७५० पर्यंत भारतातील बहुतांश राजवाडे फसवाफसवी आणि कपट करून आपल्या ताब्यात घेतले होते. बंगाल अजून त्यांच्या हातात सापडले नव्हते आणि त्या वेळी बंगाल चा नवाब होता सिराजुद्दौला. इंग्रजांनी राजपूत, शीख इत्यादींकडून सत्ता हिसकावून घेतली होती, परंतु प्लासीच्या युद्धाचीच जास्त चर्चा होते. हे एक अर्ध सत्य आहे.
२३ जून १७५७ ला मुर्शिदाबाद च्या दक्षिणेला २२ मैल अंतरावर नदिया जिल्ह्यात गंगा नदीच्या किनारी प्लासी नावाच्या स्थानावर हे प्लासीचे युद्ध झाले होते. या युद्धात एका बाजूला ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीची सेना होती तर दुसऱ्या बाजूला बंगालच्या नवाबाची सेना. कंपनीच्या सेनेने रॉबर्ट क्लाइवच्या नेतृत्वाखाली नवाब सिराजुद्दौला याला पराभूत केले होते. या युद्धाला भारतासाठी अत्यंत दुर्भाग्यजनक मानले जाते. या युद्धापासूनच भारताची गुलामीची कहाणी सुरु होते.
यानंतर कंपनीने ब्रिटीश सैन्याच्या मदतीने हळू हळू आपले पाय रोवायला सुरुवात केली आणि जवळ जवळ संपूर्ण भारतावर कंपनीचा ध्वज फडकवला. उत्तर आणि दक्षिण भारतातील सर्व मुस्लीम शासकांसह शीख, मराठा, राजपूत आणि अन्य शासकांच्या शासनाचा अंत झाला.
भारत-पाक युद्ध (1947)
इतिहासकार मानतात की २०० वर्षांच्या ब्रिटीश राजवटीच्या दरम्यान साधारण १९०४ मध्ये नेपाळला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यात आली. पुढे सन १९०६ मध्ये भूतान स्वतंत्र देश घोषित करण्यात आला. तिबेट १९१४ मध्ये भारतापासून अलग करण्यात आले. नंतर १९३७ मध्ये बर्मा वेगळा देश बनला. याच प्रकारे इंडोनेशिया, मलेशिया देखील स्वतंत्र राष्ट्र बनली. नंतर १९४७ मध्ये भारताचे आणखी एक विभाजन करण्यात आले. अर्थात या मुद्द्यावर अनेक इतिहासकारांत मतभेद आहेत.
१९४७ मध्ये भारताचे पुन्हा एकदा विभाजन झाले. माउंटबेटन, चर्चिल, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना आणि लियाकत अली खान यांनी मिळून भारताचे तुकडे केले. विभाजन देखील जिना यांच्या अटीवर झाले. भारतापासून वेगळ झालेल्या भागांना पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) म्हणत असत. विभाजनानंतर पाकिस्तानची नजर होती काश्मीरवर. त्यांनी काश्मिरी लोकांना भडकवायला सुरुवात केली आणि शेवटी काश्मीरवर हल्ला केला.
२६ ऑक्टोबर १९४७ रोजी जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन शासक महाराजा हरीसिंह यांनी आपले संस्थान भारतात विलीन करण्याच्या कागद पत्रांवर सह्या केल्या होत्या. गव्हर्नर जनरल माउंटबेटन ने २७ ऑक्टोबरला याला मंजुरी दिली. या कायदेशीर कागदांवर स्वाक्षरी होताच समस्त जम्मू आणि काश्मीर, ज्यामध्ये पाकिस्तानने अवैध कब्जा केलेला भाग देखील येतो, भारताचे अविभाज्य अंग बनले होते. १९४७ रोजी विभाजित भारत स्वतंत्र झाला. त्या दरम्यान भारतीय संस्थानांच्या विलीनीकरणाचे कार्य चालू होते. त्यामुळे या राज्यांमध्ये अस्थिरता आलेली होती.
अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाटणी झालेली होती ज्यामध्ये क्षेत्रांचे निर्धारण देखील झालेले होते, परंतु तरी देखील जीनांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत २२ ऑक्टोबर १९४७ रोजी काबाईली लुटारुंच्या वेशात पाकिस्तानी सैन्य काश्मीर मध्ये घुसवले. वर्तमानातील पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहिले. हा रक्तरंजित खेळ पाहून काश्मीरचे राजा हरीसिंह जम्मूला निघून आले. तिथून त्यांनी भारताकडे सैनिकी सहाय्य मागितले, परंतु सहाय्य पोचेपर्यंत खूप उशीर झालेला होता. नेहरूंची जिनांशी मैत्री होती. त्यांना वाटले नव्हते की जिना असे काही करतील, परंतु जिनांनी तसेच केले.
भारतीय सेना ओअकिस्तनि सैन्याचा धुव्वा उडवत त्यांनी अवैध कब्जा केलेला प्रांत पुन्हा आपल्या ताब्यात घेत वेगाने पुढे घोडदौड करत होती की मधेच नेहरूंनी ३१ डिसेंबर १९४७ ला यू.एन्.ओ. कडे अपील केले की त्यांनी पाकिस्तानी लुटारूंना भारतावर आक्रमण करण्यापासून रोखावे. याचे फळ म्हणून १ जानेवारी १९४९ ला युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यापूर्वी पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी करून कब्जा करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.
नेहरू मधेच उठून यू.एन्.ओ. कडे गेल्यामुळे युद्धविराम झाला आणि भारतीय सैन्याचे हात बांधले गेले ज्यामुळे त्यांना पाकिस्तानने अवौध कब्जा केलेले बाकी उरलेले प्रांत पुन्हा कधीही परत मिळवता आले नाहीत. आज काश्मीरमध्ये अर्ध्या भागात नियंत्रण रेषा आहे तर काही भागात आंतरराष्ट्रीय सीमारेषा. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरून सातत्याने गोळीबार आणि घुसखोरी चालूच असते.
भारत-चीन युद्ध १९६२
चीनी नेता माओत्से तुंग ने ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ आंदोलन अयशस्वी झाल्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावर पुन्हा आपले नियंत्रण आणण्यासाठी १९६२ मध्ये भारताशी युद्ध छेडले. तर एका रिपोर्टमध्ये असा खुलासा आहे की चीनविरुद्ध भारत युद्धात पराभूत होण्यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुच सर्वस्वी जबाबदार आहेत.
उल्लेखनीय गोष्ट अशी की भारताच्या त्या ३८००० वर्ग किमी भागावर आजही चीनचा कब्जा आहे. हैंडरसन ब्रूक्सच्या एका रिपोर्टच्या मदतीने पत्रकार नैविल मैक्सवेल ने दावा केला आहे की ६२ च्या या युद्धात झालेल्या भारताच्या पराभवाला फक्त आणि फक्त तत्कालीन पंतप्रधान नेहरुच कारणीभूत आहेत. नैविल त्यावेळी नवी दिल्ली इथे टाईम्स ऑफ लंडन साठी काम करत होते. १९६२ च्या युद्धानंतर भारत सरकारसाठी लेफ्टनंट जनरल हेंडरसल ब्रूक्स आणि ब्रिगेडियर पीएस भगत यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला होता आणि त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना पराभवाला कारणीभूत ठरवले होते.
भारत-पाक युद्ध १९६५
हे युद्ध झाले तेव्हा भारताचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचा राष्ट्रपती होता जनरल अयुब खान. भारतीय फौजांनी लाहोरला लक्ष्य करून पश्चिम पाकिस्तानवर हल्ले केले. अयुब खानने भारताविरुद्ध पूर्ण युद्धाची घोषणा केली. ३ आठवडे चाललेल्या भीषण युद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मध्यस्तीने दोन्ही देश युद्धविराम करायला तयार झाले. ताश्कंत इथे शास्त्री आणि खान यांच्यात बैठक झाली आणि त्यांनी घोषणापत्रावर सह्या केल्या. त्यानुसार दोनही नेत्यांनी द्विपक्षीय मामले शांतीपूर्ण मार्गांनी सोडवण्याचा संकल्प केला. आपापल्या सेना १९६५ च्या आधीच्या सीमेवर परत बोलावण्यासाठी दोन्ही नेते तयार झाले. या तहानंतर केवळ एका दिवसातच लाल बहादूर शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू झाला.
भारत-पाकिस्तान युद्ध (१९७१)
१९७१ मध्ये भारत पाकिस्तानचे युद्ध झाले ज्यामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा सपाटून पराभव झाला आणि एक नवे राष्ट्र बांग्लादेश निर्माण झाले. पाकिस्तानने तयारी करून पुन्हा उरलेले काश्मीर हस्तगत करण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खडा मुकाबला केला आणि अखेर पाकिस्तानी सैन्याच्या १ लाख सैनिकांनी भारतीय सेनेच्या समोर आत्मसमर्पण केले आणि 'बांग्लादेश' नावाच्या एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला. इंदिरा गांधींनी इथे एक फार मोठी चूक केली. त्या हा काश्मीर प्रश्न कायमसाठी सोडवू शकल्या असत्या, परंतु जुल्फिकार आली भुट्टो यांच्या बोलण्यात येऊन त्यांनी पाकिस्तानचे १ लाख सैनिक सोडून दिले.
या युद्धानंतर पाकिस्तानला अक्कल अल्ली की काश्मीर हस्तगत करण्यासाठी आमने-सामने लढाईत भारताच्या समोर टिकाव धरणे अशक्य आहे. १९७१ मधल्या मानहानीकारक पराभवानंतर काबुल येथील पाकिस्तान मिलिट्री अकादमी मधील सैनिकांना या पराभवाचा बदला घेण्याची शपथ देण्यात आली आणि पुढच्या युद्धाची तयारी सुरु करण्यात आली परंतु अफगाणिस्तानात परिस्थिती बिघडू लागली.
१९७१ ते १९८८ पर्यंत पाकिस्तानी सेना आणि कट्टरपंथी अफगाणिस्तान प्रकरणात अडकून राहिले. इथे पाकिस्तानी सेनेने स्वतःला गोरिला युद्धात मजबूत बनवल्र आणि युद्धाच्या नवनवीन पद्धती शिकून घेतल्या. या पद्धती आता भारतावर अजमावण्यात येऊ लागल्या. पाकिस्तानच्या या खेळत भारत सरकार गुंतत गेले आणि आजही गुंतून पडलेले आहे.
Comments
Post a Comment